Advertisement

स्त्रीशक्तीला सलाम करणारा 'जश्न-ए-हुस्न'!


स्त्रीशक्तीला सलाम करणारा 'जश्न-ए-हुस्न'!
SHARES

स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करणारा 'जश्न-ए-हुस्न' हा सुरेल गीतांचा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमात गायिका राणी वर्मा यांचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.कधी होणार कार्यक्रम?

राणी वर्मा यांचा स्त्रीशक्तीवर आधारित हा कार्यक्रम महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच आठ मार्चला वांद्रे येथील रंगशारदा येथे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाद्वारे समस्त महिलांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. आठ मार्चनंतर या कार्यक्रमाचे प्रयोग महाराष्ट्रभर केले जातील.काय आहे या कार्यक्रमात?

या कार्यक्रमात विविध गाणी आणि नृत्याविष्कार सादर केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी साधारण ४० जाणांचा ताफा जोरदार तालीम करत आहे. या कर्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाचं सूत्रसंचालन आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करणार आहे. तर दिग्दर्शन पडियार करत असून कोरिओग्राफी विश्वास नाटेकर यांनी केली आहे. नाटेकर यांनी याआधी 'मी मराठी’, 'संगीत का मेला’ या कार्यक्रमांसाठी कोरिओग्राफी केली आहे.

या कार्यक्रमाला अनेक आघाडीच्या गायकांचा सुरेल आवाज लाभणार आहे. त्यासाठी सध्या श्लोक कुलकर्णी, श्रीरंग भावे, ज्योतिका शर्मा, अर्चना गोरे, मनिष आणि नवीन त्रिपाठी यांची जोरदार तयारी सुरू आहे.प्रसिद्ध गायिका राणी वर्मा आणि त्यांची बहीण वंदना गुप्ते यांनी महिलांवर आधारीत 'ती' हा कार्यक्रम आणला होता. वंदना गुप्ते यांनी आजवर अनेक मराठी नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


संबंधित विषय
Advertisement