Advertisement

हा बघा, इंग्लिश गाण्यांना ढोल, ताशाचं म्युझिक देणारा अवलिया


हा बघा, इंग्लिश गाण्यांना ढोल, ताशाचं म्युझिक देणारा अवलिया
SHARES

ढोल, ताशा कडाडला की मराठी माणसाच्या अंगात आपोआप उत्साह संचारतो. पाय थिरकायला लागतात. मग काय एखादा उत्सव असो, मिरवणूक असो किंवा कुणाच्या लग्नाची वरात, नाचणाऱ्यांच्या घोळक्यात उडी मारून घामाने आेलंचिंब होईपर्यंत नाचण्याची हौस भागवून घेणारे 'हौशी कलाकार' आपल्याकडे ढिगभर आढळतात. असाच एक हौशी कलाकार सध्या यू ट्युबवर चर्चेचा विषय बनलाय. हा अवलिया कलाकार वेर्स्टन गाण्यांवर ढोल, ताशाच्या दमदार संगीताचा साज चढवतोय. या अवलिया कलाकाराचं नाव आहे, जिगर राज पोपट.




१० लाखांहून अधिक व्ह्यूज

जिगरचे यू ट्युबवरील व्हिडीओ संगीत शौकिनांना इतके आवडत आहेत की संगीतप्रेमींनी १० लाखांहून अधिक वेळा हे व्हिडीओ पाहिलेत. इतकंच नाही, तर हे व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मेसेजिंग अॅपवरून मोठ्या प्रमाणात शेअर्सही केले जात आहेत. मागच्या ७ महिन्यांत जिगरच्या यू ट्युब चॅनलवर ७२ हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स झालेत. ते ही फक्त ६ व्हिडीओ अपलोप केल्यानंतर.


याव लिंकवर क्लिक करून जिगरचं म्युझिक ऐका -

https://www.youtube.com/watch?v=7A9lbl0nFk4
https://www.youtube.com/watch?v=BR8ekJUZDMY
https://www.youtube.com/watch?v=5JtXN7aJxOM


लहान वयात मोठं सक्सेस

इतकं सक्सेस म्युझिक इंडस्ट्रीतील एखाद्या अनुभवी, वयस्कर व्यक्तीलाच मिळेल, असं तुम्हाला कदाचित वाटू शकेल. पण पुढची माहिती वाचून आश्चर्यचकीत होऊ नका. जिगर अवघ्या २० वर्षांचा आहे. विलेपार्लेमध्ये राहणारा जिगर सध्या डीजे संघवी कॉलेजमधून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करतोय. म्युझिकची आवड असल्याने खूप कमी वयातच जिगर अनेक वाद्ये वाजवायला शिकला. १२ वर्षांचा असल्यापासून तो म्युझिक बनवायला लागला.

भारतीय वाद्ये जिगरच्या विशेष आवडीची आहेत. त्यामुळेच त्याच्या बिल्डिंगमध्ये कुठलाही कार्यक्रम असो जिगर तेथे ढोल, ताशा वाजवताना हमखास दिसतो. कार्यक्रमांत वाजवत असतानाच त्याला ढोल, ताशा वाजवतानाचा व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड करण्याची कल्पना सुचली.

जिगरनं कुठल्याही प्रोफेशनल म्युझिक क्लासमधून ढोल, ताशा वाजवण्याचे ट्रेनिंग घेतलेलं नाही. यू ट्युबवरचे व्हिडीओ बघूनच तो ही वाद्ये वाजवायला शिकला. बिल्डिंगच्या आवारात, कार्यक्रमांमध्ये ढोल, ताशा वाजवताना अनेकांनी त्याचे कौतुक करायला सुरूवात केली. त्यातून जिगरचा उत्साह वाढला.




अशी सुचली कल्पना

इंग्लिश गाण्यांना ढोल, ताशाचे म्युझिक देण्याची कल्पना कशी सुचली, याचा खुलासा करताना तो म्हणतो, ''एक दिवस इंग्लिश गाणं ऐकता एेकता अचानक मला वाटलं की, या म्युझिकला माझ्या ढोल, ताशांची साथ का देऊ नये? गाणं कुठलंही असो त्याच्यावर इंडियन किंवा वेस्टर्न कोणतंही म्युझिक सहज बसू शकतं. अट फक्त एवढीच की ते म्युझिक चांगलं असायला हवा. माझ्या मते माझा हा प्रयोग म्युझिक लव्हर्सला नक्कीच आवडेल.''

जिगर पुढे म्हणतो, ''क्लोसर या इंग्लिश गाण्याला मी सर्वात पहिल्यांदा ढाेल, ताशाचं म्युझिक दिलं. हा व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड केल्यापासून १३ लाखांहून अधिक जणांनी तो पाहिलाय. त्यानंतर एकापाठोपाठ एक असं करून ६ व्हिडीओ मी अपलोड केले. त्यातील लेटेस्ट व्हिडीओ २३ लाखांहून अधिकवेळा बघितला गेलाय.


असा बनवतो व्हिडीओ

जिगर अभ्यास करता करताच व्हिडीओ बनवतो. एक व्हिडीओ बनवण्यासाठी त्याला ४ ते ५ दिवस लागतात. जिगर स्वत:च हे व्हिडीओ शूट करून ते सोशल मीडियावर अपलोड करतो. व्हिडीओच्या पब्लिसिटीसाठी त्याचे मित्र आणि कुटुंबियदेखील त्याला मदत करतात.

मी पहिल्यांदा इंग्लिश गाणं ऐकतो. त्यानंतर या गाण्यावर वाजवण्याची प्रॅक्टीस करतो. एकदा का संगीत परफेक्ट बसलं की मग त्याचे शुटींग करतो. अनेकदा माझे सबस्कायबर्सच मला गाणं सुचवून त्याला म्युझिक देण्यास सांगतात.

जिगरला अजून म्युझिकमध्ये बरीच क्रिएटीव्हीटी दाखवायची आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भारतीय संगीताचा दर्जा सर्वांपर्यंत पोहचवण्याची इच्छा बाळगणाऱ्या जिगरला आपलं शिक्षणही वेळेत पूर्ण करायचं आहे.



हे देखील वाचा - 

शांताबाई'पासून 'सोनू'पर्यंत...



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा