Advertisement

कर्करुग्णांसाठी 'मुस्कुराहट'


कर्करुग्णांसाठी 'मुस्कुराहट'
SHARES

परळ - शांतीदूत या संस्थेच्या वतीनं कर्करुग्णांसाठी मुस्कुराहट या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी परळ पूर्व येथील दामोदर सभागृहात हा कार्यक्रम झाला. यात मराठी-हिंदी गीतांचा वाद्यवृंद, नृत्य, नाटक आणि जादूचे प्रयोग असे कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाट्यनिर्माता राहुल भंडारे, अभिनेत्री मंजू मालगुडे, विकास सोनवणे, किशोर बच्छाव, बतावणी विर, चंद्रकांत बारशिंगे, विकास गायकवाड आदी उपस्थित होते. या वेळी सादर झालेल्या नाट्यप्रयोगांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. संस्थेच्या वतीने 2016च्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांचा सत्कारही या कार्यक्रमात करण्यात आला. त्यात सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश धनावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे, शासकीय अधिकारी प्रज्ञा तायडे, नाट्यनिर्माते सुधाकर नार्वेकर, संत गाडगे महाराज संस्था विश्वस्त प्रशांत देशमुख, एअर इंडियाचे माजी मुख्य व्यवस्थापक भीमराव गायकवाड यांना शांतीदूतचे संस्थापक-अध्यक्ष सिद्धार्थ शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा