Advertisement

वसंत देसाई यांना संगीतमय आदरांजली


वसंत देसाई यांना संगीतमय आदरांजली
SHARES

शिवाजी पार्क - शिवाजी पार्क परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी बुधवारची सकाळ ही सुरेल प्रभात ठरली. निमित्त- वसंत देसाई यांच्या 41 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना वाहिल्या जाणाऱ्या स्वरांजलीचं. युवा कला मंचच्या वतीनं आयोजित ज्येष्ठ संगीत संयोजक आणि वसंत देसाई यांचे शिष्य सोमनाथ परब यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या कार्यक्रमात बालमोहन आणि सानेगुरुजीच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वसंत देसाई यांना स्वरांजली वाहिली. मराठी आणि हिंदी चित्रपटसंगीताच्या प्रांतात एकाहून एक अवीट गोडीच्या गाण्यांना स्वरसाज चढवणारे वसंत देसाई आजही संगीतरसिकांच्या ह्रदयात स्थान राखून आहेत.
दो आँखे बारह हाथ, गूंँज उठी शहनाई, शकुंतला, झनक झनक पायल बाजे, गुड्डी, अमर भूपाळी आदी हिंदी-मराठी चित्रपट आणि ‘गीता गाती ज्ञानेश्वर’, ‘जय जय गौरीशंकर’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘प्रीतीसंगम’सारखी नाटकं वसंत देसाई यांच्या संगीतरचनांमुळे अजरामर झाली. आजच्या पिढीच्या शिलेदारांकडेसुद्धा गाता गळा, आणि संगीताचा कान आहे, हे या कार्यक्रमाने सिद्ध करुन दाखवलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा