Advertisement

सावनीचं नवं मॅशअप..टिकटिक ते पियु बोले!


सावनीचं नवं मॅशअप..टिकटिक ते पियु बोले!
SHARES

सावनी रविंद्रने फिल्म प्लेबॅक सिंगिंगसोबतच मॅशअपच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला आहे. तिच्या मॅशअप्सना नेहमीच तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलंय. त्यामुळेच आता सावनी आपलं ‘टिक-टिक वाजते - पियु बोले’ हे मॅशअप घेऊन आली आहे. संगीतकार गौरव डगावकरसोबत सावनीने हे मॅशअप गायलंय.


जॅमिंग सेशनमध्ये तयार झालं गाणं!

सावनी आणि गौरव याअगोदर 'वन वे तिकीट' चित्रपटातल्या ‘मस्त मलंगा’ गाण्यासाठी एकत्र आले होते. या गाण्यावर चाहत्यांच्या प्रेमासोबतच पुरस्कारांचीही बरसात झाली होती. आपल्या नव्या मॅशअपविषयी सावनी सांगते, “गौरव भेटला की आमची नेहमीच जॅमिंग सेशन्स रंगतात. अशाच एका जॅमिंगसेशन दरम्यान हे गाणं आकाराला आलं. गौरव 'टिकटिक वाजते' गात होता आणि मी 'पियु बोले' गाऊ लागले आणि मॅशअप रंगलं. मग आम्ही हे मॅशअप रेकॉर्ड करायचं ठरवलं. गौरव आणि माझं हे पहिलं मॅशअप आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, सगळ्यांना हे मॅशअप खूप आवडेल.”कर्जतमध्ये झालं शूट

साँगफेस्ट इंडिया निर्मित या गाण्याचं चित्रीकरण कर्जतच्या तन्मय फार्म्समध्ये झालं आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अरेंजर दिपजंन गुहा यांनी गाण्यासाठी म्युझिक अरेंजमेंट केली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा