Advertisement

गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना आता त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे.

गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक
SHARES

गायक एसपी बालासुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांची प्रकृती आता गंभीर झाली आहे, ते लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना आता त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे.

२४ सप्टेंबरला हॉस्पिटलनं त्यांचं मेडिकल बुलेटिन जाहीर केलं. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनसार, "गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत"

बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. ५ ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपण बरं असल्याची माहिती व्हिडिओद्वारे आपल्या चाहत्यांना दिली होती.

काही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली होती. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली होती की, "माझे वडील आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे. त्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे."हेही वाचा

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान 'या' दोन अभिनेत्यांना कोरोनाची लागण

नवाझुद्दिनच्या अडचणीत वाढ, पत्नीकडून पोलिसात तक्रार दाखल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा