Advertisement

अमेरिकेतल्या लोकप्रिय डान्स शो चे 'किंग्स' ठरली मुंबईची पोरं!

मुंबईतल्या १४ जणांच्या हिप-हॉप डान्स ग्रुपनं अमेरिकेचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो जिंकला आहे. 'द किंग्स' यंदाच्या 'द वर्ल्ड ऑफ डान्स' शोच्या तिसऱ्या पर्वाचे विजेते ठरले आहेत.

अमेरिकेतल्या लोकप्रिय डान्स शो चे 'किंग्स' ठरली मुंबईची पोरं!
SHARES

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा 'एबीसीडी २' हा चित्रपट सर्वांनीच पाहिला असेल. मुंबईत राहणाऱ्या एका डान्स ग्रुपनं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अमेरिकेतील एका रिअ‍ॅलिटी शो वर भारताचं नाव कसं कोरलं, हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील हीच कथा प्रत्यक्षात उतरवली आहे ती मुंबईतल्या हिप हॉप डान्स ग्रुप 'द किंग्स'नं. खऱ्या अर्थानं ही पोरं अमेरिकेतल्या रिअ‍ॅलिटी शो चे किंग्स ठरले आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही.

१४ जणांच्या हिप-हॉप डान्स ग्रुपनं अमेरिकेचा सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय डान्स रिअ‍ॅलिटी शो जिंकला आहे. 'द किंग्स' यंदाच्या 'द वर्ल्ड ऑफ डान्स' शो च्या तिसऱ्या पर्वाचे विजेते ठरले आहेत. त्यामुळे भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.


परीक्षकांची मनं जिंकली

'द वर्ल्ड ऑफ डान्स' या कार्यक्रमाचे परीक्षक जेनिफर लोपेज, ने यो आणि ड्रेक हॉग यांना ‘द किंग्स’चा अंतिम फेरीतील परफॉर्मन्स खूप आवडला. या तिघांनीही ‘द किंग्स’च्या परफॉर्मन्सनंतर उभं राहून टाळ्या वाजवल्या. ५ मे रोजी ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’ ची अंतिम फेरी झाली. यामध्ये ‘द किंग्स’ सोबतच इतर देशातील अनेक ग्रुपनं आपल्या डान्सनं परीक्षकांची मनं जिंकली. पण सर्व ग्रुपमध्ये बाजी मारली ती मुंबईतल्या द किंग्स ग्रुपनं. विजेत्या ग्रुपला ट्रॉफिसोबत एक मिलिअन डॉलर म्हणजेच सुमारे ६ कोटी ९३ लाख रुपयांचं पारितोषिकही मिळालं आहे.

दिग्दर्शक-निर्माता आणि डान्स कोरियोग्राफर रेमो डिसोजानं ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. आज तुम्ही भारताचं नाव अधिक उंचावलं आहे. भारतासाठी आणि आमच्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे, असा संदेशही त्यांनी ट्विटरवर दिला आहे. 


अमेरिकेतील प्रसिद्ध शो

'द वर्ल्ड ऑफ डान्स’ हा अमेरिकेचा एक  रिअ‍ॅलिटी डान्स शो आहे. यामध्ये जगभरातील डान्सर्स सहभागी होत असतात. तीन महिने चाललेल्या या  रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये ‘द किंग्स’ ने परीक्षकांच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही मनावर अधिराज्य गाजवलं. ‘द वर्ल्ड ऑफ डान्स’चं हे तिसरं पर्व आहे. याची सुरुवात २६ फेब्रुवारी २०१९ पासून झाली होती.


'द किंग्स' ची यशस्वी वाटचाल

‘द किंग्स’ हा डान्स ग्रुप मुंबईचा आहे. यामध्ये १४ मुलं आहेत. हे सर्व १७ते २७ या वयोगटातील आहे. या ग्रुपची सुरुवात २००८ मध्ये मुंबईत झाली. स्ट्रीट डान्सिंगपासून यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या तिसऱ्या पर्वात या डान्स ग्रुपला ओळख मिळाली. ‘द किंग्स’ ने यापूर्वी २०१५ मध्ये ‘वर्ल्ड हिप-हॉप डान्स चॅम्पिअनशिप’ मध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं.



हेही वाचा -

अवधूत, स्वप्निल, जुईलीची सांगीतिक अमेरिका वारी!




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा