Advertisement

जबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर

विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे आहे.

जबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर
SHARES

पदार्पणतच श्री स्वामी समर्थांच्या चरित्रावर आधारित असलेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाचं यशस्वी दिग्दर्शन करणारा लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या 'खतरनाक...' या गाण्यामुळे चांगलाच पॅाप्युलर झाला आहे. 'मुळशी पॅटर्न' हे त्याच्या आगामी चित्रपटातील गाणं तरुणाईला मोहिनी घालण्यात यशस्वी ठरलं आहे. 'खतरनाक...' या गाण्याच्या यशानंतर या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.


शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य

औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या ऊभ्या राहिल्या त्यांच्यापर्यंत या विकासाचा लाभ पोहोचला नाही. विकासाच्या नावाखाली भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या समस्यांवर भाष्य करणाऱ्या बहुचर्चित 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडेचे आहे.


उत्कंठावर्धक ट्रेलर

चित्रपटाच्या या  ट्रेलरमध्ये विकासाच्या नावाखाली जमिनी गेल्यावर शेतकऱ्याच्या वाट्याला येणारा अस्वस्थपणा, विस्थापित होऊन गाठलेले शहर आणि तिथे नजरेस पडणारे जगण्यातील भकासपणा दिसतो. भूमिहीन शेतकऱ्याची पुढची अस्वस्थ पिढी गुन्हेगारीकडे कशी वळली? यावर थेट भाष्य करण्यात आल्याचे दिसते. धारदार संवाद, गाणी आणि टीजर मधून निर्माण झालेली 'मुळशी पॅटर्न'ची उत्सुकता या अतिशय उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे अधिक ताणली गेली आहे.


मालविका गायकवाडचं पदार्पण

चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर मुख्य भूमिकेत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण विठ्ठल तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा 'मुळशी पॅटर्न'मधून पदार्पण करत आहे.

ट्रेलर  लिंक - https://www.youtube.com/watch?v=M5iBVasSFQc



हेही वाचा - 

संयमी करणार ‘माऊली’चा जयघोष!

स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा