Advertisement

संयमी करणार ‘माऊली’चा जयघोष!


संयमी करणार ‘माऊली’चा जयघोष!
SHARES

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिरझीयां’ या चित्रपटात एक नवोदित अभिनेत्री झळकली होती. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धनसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या संयमी खेरने पहील्याच चित्रपटात लक्ष वेधून घेतलं. संयमी आता ‘माऊली’चा जयघोष करीत मराठीकडे वळली आहे.


माऊली चित्रपटात दिसणार 

संयमीबाबत सांगायचं तर ती मराठमोळ्या अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे. अभिनेत्री तन्वी आझमी तिची आत्या आहे. राकेश मेहरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या चित्रपटाद्वारे चंदेरी दुनियेत दाखल होत तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण चित्रपट मात्र बाॅक्स आॅफिसवर कमाल दाखवू शकला नव्हता. मुळात मराठी असलेली संयमी आता ‘माऊली’ या बहुचर्चित आगामी चित्रपटात दिसणार आहे.


पहिला मराठी चित्रपट 

या चित्रपटात तिच्या जोडीला रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. ‘माऊली’ हा संयमीचा पहिला मराठी चित्रपट आहे. संयमीने आजीसोबत बरेच मराठी चित्रपट पहिले आहेत. विशेषत: मराठीतील गाजलेले चित्रपट ती आवर्जून पाहते. याच चित्रपटांनी आपल्याला ‘माऊली’ चित्रपटासाठी तयार केल्याचं ती मानते. संयमीची आत्या असलेल्या तन्वी यांनी ‘लय भारी’ या चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारली होती. 


नावाचा आदर राखेल

संयमीच्या म्हणण्यानुसार, माझी आजी उषा किरण आणि त्यांच्या कामाची मी खूप मोठी प्रशंसक असून, त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला आवडलं असतं. मी त्यांचे चित्रपट पाहून बरेच काही शिकले आहे आणि मला आशा आहे की मी त्यांच्या नावाचा आदर राखण्यात यशस्वी होईन.



हेही वाचा - 

स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...

रोहितचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा