Advertisement

रोहितचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट

गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या 'बेखबर कशी तू...' हे गीत संगीतकार व्यानने संगीतबध्द केलं असून गाणं रॉकस्टार रोहित राऊतने गायलं आहे.

रोहितचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट
SHARES

कोणत्याही व्यक्तीला आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपली सर्वात आवडती वस्तू हवी असते. एखाद्या गायक किंवा संगीतकारला जर वाढदिवसाच्या दिवशी संगीताशी निगडीत काही करायला मिळालं तर त्यांच्या आनंदाला पारावार राहात नाही. सध्याचा रॅाकिंग गायक असलेल्या रोहित राऊतला वाढदिवसाच्या दिवशी म्युझिकल बर्थडे डे गिफ्ट मिळणार आहे.


म्युझिक अल्बम

१८ नोव्हेंबरला रोहितचा वाढदिवस आहे. याच दिवशी चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर आणि बबली गर्ल संस्कृती बालगुडे यांचा रोमँटिक म्युझिक अल्बम रिलीज होणार आहे. सेवन सीज मोशन पिक्चर्स आणि व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत समीर परब आणि संतोष परब निर्मित ओमकार माने आणि जयपाल वाधवानी दिग्दर्शित 'बेखबर कशी तू...' हा तो म्युझिक अल्बम तयार केला आहे.


निव्वळ योगायोग 

गीतकार आशिष देशमुख आणि व्यान याने लिहिलेल्या 'बेखबर कशी तू...' हे गीत संगीतकार व्यानने संगीतबध्द केलं असून गाणं रॉकस्टार रोहित राऊतने गायलं आहे. डेहराडून, हृषिकेश आणि सोनीपतच्या निसर्गरम्य ठिकाणी ह्या म्युझिक अल्बमचे चित्रीकरण करण्यात आलं आहे. खरं तर हा अल्बम रोहितच्या वाढदिवशी रिलीज होणं हा निव्वळ योगायोग आहे.


युथफुल चित्रीकरण

 ओंकार माने याने या अल्बमचं दिग्दर्शन केलं आहे. या अल्बमविषयी म्हणाला की, पटकन ओठांवर रूळतील असे शब्द, श्रवणीय संगीत,  युथफुल चित्रीकरण आणि त्याला जोड आहे ती, सुमेध-संस्कृतीच्या रोमान्सची. त्यामुळे हे गाणे रसिकांना नक्कीच आवडेल, अशी मला खात्री आहे.



हेही वाचा- 

स्वप्नील मुक्ताला म्हणतो, आई तू बाबा मी होणार गं...

सर्वांचा लाडका पिकाचू डिटेक्टीव्हच्या भूमिकेत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा