Advertisement

फ्लोरा फाउंटनचे रुप पालटणार


फ्लोरा फाउंटनचे रुप पालटणार
SHARES

फोर्ट - फोर्ट परिसरातील अनेक देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्तीच्या कामाला पालिकेने शुक्रवारपासून सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात दुरुस्ती आणि दुसर्‍या टप्प्यात सुशोभिकरणाचे काम पूर्ण करुन फ्लोरा फाऊंटनचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांमध्ये फ्लोरा फाऊंटनमधील आकर्षक कारंजी उडताना पहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीपासूनच फ्लोरा फाऊंटनमधून उडणारी कारंजी बंद झाली होती. पाण्याचा प्रवाह करणारा पाईप गंजल्यामुळे त्यामधून गळती होत होती. त्यामुळे फ्लोरा फाऊंटनच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. पालिकेकडून फ्लोरा फाऊंटनच्या या दुरुस्तीचे काम एम. एस. इंटॅक्ट या संस्थेला देण्यात येणार असून पहिल्या टप्प्याच्या कामासाठी एक कोटी 62 लाख 7 हजार 824 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या ए वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी हुतात्मा चौकात नारळ फोडून कामाचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक गणेश सानप, शाखाप्रमुख विक्रम धोत्रे, महिला शाखा संघटक बिना दौंडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्लोरा फाऊंटन आणि हुतात्मा चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे म्हणून गणेश सानप यांनी गेल्या चार वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी ए वॉर्ड कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहारही केला होता. त्यानुसार अखेर या कामास सुरुवात झाली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा