Advertisement

शिवसेनेचे 20 ते 22 आमदार फुटणार - रवी राणा


शिवसेनेचे 20 ते 22 आमदार फुटणार - रवी राणा
SHARES

सत्तेत सोबत असूनही सरकारवर जोरदार टीका करणारी शिवसेना दसऱ्यानंतर पाठिंबा काढून घेत राजकीय भूकंप करणार का? अशी चर्चा सरु असतानाच अपक्ष आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी गौप्यस्फोट केला. दसऱ्यानंतर जरी शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तरी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील, असा दावा रवी राणा यांनी केला आहे.


काय म्हणाले राणा...

शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील, ते भाजपमध्ये सहभागी होतील, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी केला. तर शरद पवारही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, असाही दावा त्यांनी यावेळी केला. तसेच, शरद पवार यांचा नागरी सत्कार प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. जिथे-जिथे सत्कार होईल, तिथे तिथे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे काम सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभे राहतील, असा विश्वासही रवी राणा यांनी व्यक्त केला.

शिवसेनेने दसरा मेळाव्यात पाठिंबा काढण्याची घोषणा केली, तरी काही फरक पडणार नाही. कारण आम्ही अपक्ष 6 आमदार देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत सकारात्मक आहोत. शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे ‘वर्षा’ बंगल्यावर दिसतील. त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार अजिबात अल्पमतात येणार नाही.

रवी राणा, अपक्ष, आमदार



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा