Advertisement

आदित्य ठाकरेंचं आरोग्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणासंदर्भात 'या' केल्या मागण्या

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहले आहे.

आदित्य ठाकरेंचं आरोग्यमंत्र्यांना पत्र, लसीकरणासंदर्भात 'या' केल्या मागण्या
SHARES

कोरोना योद्ध्यांना तिसरा डोस देण्याचा विचार करावा. तसंच, लसीकरणात किमान वय हे १५ वर्ष करावे, असे पत्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांना लिहले आहे.

आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेला पत्रात तीन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

  • फ्रंटलाइन वर्कर्स, आरोग्य सेवा कर्मचारी, ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. त्यांना तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.
  • लसीकरणाचे किमान वय साधारण १८ आहे. ते वय १५ वर करावे. जगभरात काही ठिकाणी करण्यात आले आहे. आपल्याकडे लसीकरणाचे किमान वय १८ वर्ष आहे. शारीरिकदृष्ट्या १५ आणि १८ मध्ये तेवढा फरक लहान मुलांमुलींमध्ये पडत नाही.
  • मुंबईत पहिला डोस घेणारे १०० टक्के झाले आहेत. तर, दुसरा डोस ७३ टक्के लोकांनी घेतला आहे. चार आठवड्यांपर्यंत दोन डोस मधील अंतर कमी केले तर १५ ते 20 जानेवारीपर्यंत दुसरा डोस पूर्ण करु शकतो, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी दुपारपर्यंत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या १० झाली आहे. तर ११ संशयित रुग्णांचे सॅम्पल जिनोम सीक्वेन्सिंगला पाठवण्यात आले आहेत.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून ठाणे जिल्ह्यात २९५ प्रवासी आले होते. त्यातील १०९ जणांचा काहीच पत्ता लागत नाही. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक आणि पत्ता नमूद केला होता.

परंतु, या सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. त्यांनी दिलेला पत्ता तपासून पाहिला असता तो देखील खोटा निघाला आहे. आता हे लोक जोपर्यंत ट्रेस होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात संक्रमण फैलावण्याची भीती आहे.



हेही वाचा

लसीकरणासाठी लवकरच होणार कॉल सेंटर्सची स्थापन

RT-PCR सह 'या' चाचण्याही झाल्या स्वस्त, जाणून घ्या नवे दर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा