मुंबई कुणाच्या बापाची नाही - अबू आझमी

 Andheri
मुंबई कुणाच्या बापाची नाही - अबू आझमी
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - के पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 61 हा महिलांसाठी राखीव झाल्याने समाजवादी पक्षाच्या उमेदवार गायत्री देवी सायकल घेवून मैदानात उतरल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी गायत्री देवी यांना उमेदवार घोषित केल्याने प्रचाराचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र प्रतिस्पर्धेत शिवसेनेचे माजी नगरसेवक राजुल पटेल दावेदार आहेत. त्यामुळे राजकारणात नवोदित असलेल्या गायत्री देवी शिवसेनेला टक्कर देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राजूल पटेल 1997 ते 2012 पर्यंत 15 वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत होत्या.

2012 ला OBC पुरुष वर्ग झाल्याने सेनेचा बालेकिल्ला राजू पेडणेकर यांनी कायम राखून ठेवला होता. मात्र राजुल पटेल दुसऱ्या प्रभागातून लढल्याने 282 मतांनी पराभव झाला. त्यामुळे आता राजूल पटेल यांच्या प्रभागात पुनरागमन झाल्याने सेनेचा गड कायम राखण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे. असं असताना दुसरीकडे प्रचाराला सुरुवात करून सेनेला टक्कर देण्यासाठी 19 जानेवारीला समाजवादी पक्षातर्फे मरीयम शाळेत कार्यकर्त्यांची प्रचारसभा आयोजित करून शिवसेना आणि भाजपाला आवाहन दिलं आहे. या वेळी मुंबई कुणाच्या बापाची नाही तर तुमची आमची आहे असं म्हणत सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमींनी भाजपा आणि शिवसेनेवरही टीका केली.

Loading Comments