मुस्लिम मतांसाठी एमआयएम- सपा आमने-सामने

 Mumbai
मुस्लिम मतांसाठी एमआयएम- सपा आमने-सामने
Mumbai  -  

सँडहर्स्ट रोड - येथे समाजवादी पक्षाच्या वतीनं जनसभा घेण्यात आली. या सभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी जनसमूहाला संबोधित केलं. या सभेत समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश अबू आझमी यांनी दिले. या सभेत अबू आझमी यांनी नाव न घेता मुस्लिम बांधवांच्या नावावर मत मागणाऱ्या एमआयएमवर टीका केली. तुम्ही आश्वासनं देण्यापलीकडे मुस्लिम बांधावांसाठी काय केलं असा सवाल अबू आझमी यांनी एमआयएमला केला.

महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने गरीब जनतेसाठी काय केलं? असा प्रश्न विचारत शिवसेनेवर जोरदार टीका केली. नोटाबंदीमुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले, असं सांगत भाजपावरही टिकास्त्र सोडलं. या सभेला समाजवादी पक्षाचे वॉर्ड क्रमांक 211, 212, 213 आणि 223 या प्रभागाचे उमेदवार असलेले रईस शेख, रुक्साना सईद, वसीम सय्यद आणि डॉ. नीईदा फातीमा उपस्थित होते.

Loading Comments