Advertisement

राज ठाकरेंनी केलं केतकीच्या धाडसाचं अभिनंदन

‘तुझ माझं ब्रेक अप’ फेम अभिनेत्री केतकी चितळे हीने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी केतकीने दाखवलेल्या हिंमतीबद्दल अभिनंदन केलं. याआधी केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

राज ठाकरेंनी केलं केतकीच्या धाडसाचं अभिनंदन
SHARES

‘तुझ माझं ब्रेक अप’ फेम अभिनेत्री केतकी चितळे हीने शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज यांनी केतकीने दाखवलेल्या हिंमतीबद्दल अभिनंदन केलं. याआधी केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. 

काय म्हणाले राज?

“मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासोबत केतकी कृष्णकुंज निवासस्थानी आली होती. राज यांना भेटल्यावर सोशल मीडियावरील ट्रोल्सना तू ज्याप्रकारे रोखठोक उत्तर दिलंस, त्यामुळे अनेक दबलेल्या आवाजांना तू व्यक्त होण्यासाठीची हिंमत दिलीस, त्याबद्दल तुझं अभिनंदन” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी केतकीचं अभिनंदन केलं. 

मनोवृत्ती तशीच

सोशल मीडियावर काहीजण अत्यंत घाणेरड्या भाषेत महिलांवर टीका करतात. दुर्दैवाने, आजही महिलांच्या मतांचा, तसंच त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आदर करण्याची वृत्ती समाजात रुजलेली दिसत नाही. केतकीने या ट्रोलर्सना रोखठोक शब्दांत दिलेलं उत्तर निश्चितच कौतुकास्पद असल्याचं मत यावेळी शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केलं. 

काय आहे प्रकरण?

केतकीने काही दिवसांपूर्वी हिंदी भाषेत एक व्हिडिओ केला होता. या व्हिडिओवरुन सोशल मीडियातील ट्रोल्सनी तिच्यावर अत्यंत घाणेरड्या शब्दांत टीका केली होती. अश्लील भाषेतील या ट्रोलिंगला केतकीने सडेतोड उत्तर दिलं होतं.  



हेही वाचा-

अभिनेत्री केतकी चितळे घेणार राज ठाकरेंची भेट

फेसबुकवर अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या खोट्या अकाऊंटवर कारवाई करा- नीलम गोऱ्हे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा