अभिनेत्री केतकी चितळे घेणार राज ठाकरेंची भेट

केतकीनं मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता केतकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.

अभिनेत्री केतकी चितळे घेणार राज ठाकरेंची भेट
SHARES

अभिनेत्री केतकी चितळे हिचा हिंदीमधील व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल झाला असून तिला अनेकांनी अश्लील प्रतिक्रिया दिल्या आहेत. याप्रकरणी केतकीनं मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता केतकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे.

अश्लील कमेंट

काही दिवसांपूर्वी केतकीनं सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यवेळी 'माझे फाॅलोअर्स इतर भाषेतही असल्यानं मी हा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लीशमध्ये बनवत आहे. त्यामुळं यावर आता कोणी प्रतिक्रिया देऊन मराठीचे झेंडे फडकवू नका’, असं बोलल्यानं तिला सोशल मीडियावरच्या नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केल असून अश्लील कमेंटही करण्यात आल्या. त्यानंतर या ट्रोलिंगला केतकी चितळेनं 'जशास तसं' उत्तर दिलं.

आश्वासन काय देणार?

अश्लील प्रतिक्रीया दिल्याप्रकरणी केतकी चितळे ही शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये केतकी राज यांना सगळं प्रकरण सांगणार असल्याचं समजतं. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यामुळं आता राज ठाकरे केतकी चितळेला काय आश्वासन देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

कलानगर येथील स्कायवॉक पाडण्यासाठी महामार्गावर मेगाब्लॉक

मुंबई ते नाशिक आणि पुणे लोकलऐवजी धावणार मेमूसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा