कलानगर येथील स्कायवॉक पाडण्यासाठी महामार्गावर मेगाब्लॉक

मुंबईतील वांद्रे कलानगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेला उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. उड्डाणपूलाच्या पाडकामासाठी शनिवार आणि रविवारी महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

SHARE

मुंबईतील वांद्रे कलानगर येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेला उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. उड्डाणपूलाच्या पाडकामासाठी शनिवार आणि रविवारी महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं यामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

पर्यायी व्यवस्था

शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री हा स्कायवॉक पाडण्याचं काम करण्यात येणार आहे. त्यावेळी महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस वाहतुकीचा जास्त ताण नसल्यानं त्याचा परिणाम जाणवणार नाही आहे.

स्कायवॉक बंद 

कलानगर येथील महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू होणार आहे. याआधी दुरूस्तीच्या कामासाठी वांद्रे कोर्टापासून रेल्वे स्थानकापर्यंतचा स्कायवॉक बंद करण्यात आला होता. पुढील काही दिवसांसाठी तो दुरूस्तीच्या कारणास्तव बंदच ठेवण्यात येणार आहे.हेही वाचा -

पदवी प्रवेशांसाठी कला शाखेचा कटऑफ दुसऱ्या यादीतही जास्तच

मुंबई ते नाशिक आणि पुणे लोकलऐवजी धावणार मेमूसंबंधित विषय
ताज्या बातम्या