Advertisement

विधानसभेत भाजपला आवाहन देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी

लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर कॉग्रेस आणि एनसीपी राज्यात होणाऱ्या विधानसाभा निवडणुकीच्या तयारी करत आहेत.

विधानसभेत भाजपला आवाहन देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी
SHARES

लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. यंदा ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत भाजपला कसं आव्हान देता येईल, याची चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला राज्यातील ४८ जागांपैकी फक्त ६ जागांवर विजय मिळवता आला आहे.


इतर पक्षांसाठी रस्ते खुले

विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये इतर पक्षांना येण्यासाठी रस्ते खुले असल्याचं काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी म्हटलं आहे. या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनसे पक्ष देखील सहभागी होण्याची शक्याता वर्तवण्यात आली आहे.


३१ मे रोजी बैठक

काँग्रेस खासदारांची बैठक १ जून रोजी होणार आहे. त्यावेळी या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी ३१ मे रोजी सर्व विरोधी पक्षांसोबत बैठक बोलावली आहे.



हेही वाचा -

मुंबईतील महामार्ग होणार हिरवेगार

रुग्णालयातून पळ काढलेल्या आरोपीला वापीतून अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा