रुग्णालयातून पळ काढलेल्या आरोपीला वापीतून अटक

आरोपी त्याच्या रत्नागिरी येथील प्रेयसीच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस तिच्याजवळ चौकशीकरिता रत्नागिरीला गेले होते.

रुग्णालयातून पळ काढलेल्या आरोपीला वापीतून अटक
SHARES

मानसिक दृष्ट्या अस्थिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत, पोलिसांच्या तावडीतून पळ काढलेल्या ४७ वर्षीय आरोपीला वर्सोवा पोलिसांनी गुजरातच्या वापी परिसरातून अटक केली आहे. माजी प्रेयसीनं घात करत, आरोपी संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपीचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळाला. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नैसर्गिक विधीसाठी पोलिसांनी त्याला रुग्णालयातील शौचालयात नेलं असता त्यानं पळ काढला होता.


खिडकीतून पळाला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. न्यायालयानं त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी दिली. आरोपीला डायबेटीज असल्यानं पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी प्रथम जे.जे. रुग्णालयात नेलं. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सोमवारी त्याची रवानगी अंधेरीतील कोठडीत करायची असल्यामुळं त्यापुर्वी वैद्यकीय अहवाल सादर करणं गरजेचं होतं. त्यामुळं सोमवारी आरोपीला कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणलं होतं. त्यावेळी नैसर्गिक विधीच्या नावाखाली आरोपी शौचालयात गेला असताना त्यानं शौचालयाच्या खिडकीतून पळ काढला.


आरोपी पळण्यात यशस्वी

गस्तीवरील निष्काळजी शिपाई आणि अधिकाऱ्यामुळं हा आरोपी पळण्यात यशस्वी ठरल्यानं मुंबई पोलिस दलाची मान शरमेनं खाली गेली होती. पोलिस आरोपीचा माघ काढत असताना. आरोपी त्याच्या रत्नागिरी येथील प्रेयसीच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस तिच्याजवळ चौकशीकरिता रत्नागिरीला गेले होते. त्यावेळी तो दुसऱ्या सिमकार्डहून प्रेयसीला संपर्क करत असून त्याचं टाँवर लोकेशन गुजरातच्या वापी इथं दाखवत होतं. त्यानुसार, पोलिसांनी वापी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली आहे.हेही वाचा -

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

डॉ. पायलच्या शवविच्छेदनाच्या अहवालात मानेवर गळफासाचा वर्णसंबंधित विषय