अखिल चित्रेंचा मनसे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा

 Bandra East
अखिल चित्रेंचा मनसे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा
Bandra East , Mumbai  -  

मुंबई - मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र त्यांनी मनसेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेला नाही. वांद्रे येथील वॉर्ड क्रमांक 95 मधून अखिल चित्रे इच्छुक होते. मात्र त्यांचे तिकीट सुमन तारी यांना देण्यात आले. सुमन तारी आधी शिवसेनेमध्ये होते. नंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. वॉर्डामध्ये कोणतेही काम न करता, फक्त आर्थिक व्यवहारामुळे त्यांना तिकीट मिळाल्याचा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.

दरम्यान, आपण पदाचा राजीनामा दिला तरी एक सदस्य म्हणून मनसेमध्ये काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अखिल चित्रे मनसेचा सच्चा कार्यकर्ता आहे, त्यांच्याशी बोलून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

Loading Comments