स्थायी समितीच्या बैठकीला सदस्यांचीच दांडी

  Mumbai
  स्थायी समितीच्या बैठकीला सदस्यांचीच दांडी
  मुंबई  -  

  मुंबई - एरवी स्थायी समितीच्या बैठकांना वेळेवर उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी बुधवारी झालेल्या बैठकीला दांडी मारली. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वच पक्षांचे उमेदवार व्यस्त झाल्यामुळे त्यांचे बैठकींमधील लक्ष उडाले आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेला अध्यक्षांसह जेमतेम सात सदस्य हजर होते. त्यामुळे सदस्य संख्येअभावी सभेचे कामकाज तहकूब करण्याची वेळ ओढवली. यंदाच्या महापालिका निवडणुकीत स्थायी समितीतीतील व्यवहाराची चर्चा अधिक आहे.

  स्थायी समितीच्या बैठकीचे कामकाज सुरू करण्यास किमान नऊ सदस्यांची आवश्यकता असते. पण बुधवारी झालेल्या बैठकीत अध्यक्ष यशोधर फणसे यांच्यासह तृष्णा विश्वासराव, रमाकांत रहाटे, दीपक भूतकर, युगंधरा साळेकर, बाळा नर आणि प्रमोद सावंत एवढेच सदस्य हजर होते. हे सर्व सदस्य शिवसेना नगरसेवक असून यातील चार सदस्य हे स्वतः उमेदवार आहेत. तर दोन सदस्यांच्या पत्नी या निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे नगरसेवक सदस्य या बैठकीला हजर होते. मात्र भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आदी पक्षांचे सदस्य गैरहजर राहिले होते. त्यामुळे अखेर अध्यक्षांनी सभेचे कामकाज तहकूब केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.