युतीचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे

 Pali Hill
युतीचा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे

महानगरपालिकेमध्ये भाजप सेना युतीला जीवनदान मिळणार का?याकडे राजकीय वर्तुळाचं लक्षं लागलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे युतीबाबत काय निर्णय घेतील याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तर भाजपाच्या काही आमदारांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचं मत मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केलं आहे.

रविवारी शिवसेनेशी युती करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चार तास चाललेल्या बैठकीनंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे घेणार असल्याची माहिती भाजापाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, योगेश सागर, विद्या ठाकूर यासारखे भाजप आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments