Advertisement

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात

निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील ठाकरे गटाला (Thackeray Group) 'जय महाराष्ट्र' केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत.

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयातून बीएएमएसची पदवी घेतली आहे. 1992 मध्ये त्यांनी बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमाही पूर्ण केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी 1987 पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी काही काळ सामाजिक चळवळीत काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नीलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. विधानपरिषदेत त्यांनी शिवसेनेच्या प्रतोद म्हणून काम पाहिलं आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेतेपदही त्यांच्याकडे आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात त्यांनी काम केलं आहे. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. तसेच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या स्टार प्रचारक म्हणूनही त्या सक्रिय होत्या.



हेही वाचा

महानगरपालिका निवडणुका सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता

राष्ट्रवादीमुळे शिंदे गटात नाराजी, दोन आमदारांमध्ये तु तु-मैं मैं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा