Advertisement

शेलारांविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा


शेलारांविरोधात राष्ट्रवादीचा मोर्चा
SHARES

नरिमन पॉईँट - भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज सकाळी निदर्शने केली.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या मोर्चा प्रकरणात लुडबुड करू नये," अशी टीका केली होती. त्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी नरिमन पॉंईट येथील त्यांच्या पक्ष कार्यालय परिसरातील वाल्मिकी चौक येथे शेलांराविरोधात निर्दशने केली. यावेळी जमलेल्या महिला कार्यकर्त्यांनी आशिष शेलार यांचे फोटो जाळून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शेलार यांनी शरद पवार यांची जाहिर माफी मागावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात.
यावेळी मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष आरती साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष वंदना माने, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुखदीर कौर, उपाध्यक्ष ज्योती जगताप,सरचिटणीस विनिता सुर्वे. मुंबई सचिव विजया बानसागडे व मोठया संख्येने महिला तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
Advertisement