बीएसएफ जवानाचे धक्कादायक आरोप आणि विदारक वास्तव!

मुंबई - सोशल नेटवर्किंग साइटवर बीएसएफ जवानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तेज बहादूर यादव नावाचे हे जवान आपल्या लष्करातील तुकडीसह आपली ओळख करून देत आहे, त्याचसोबत त्यांच्या वेदनाही सांगत आहेत. हा व्हीडिओ आहे जम्मू-काश्मिरमधील बर्फाळ प्रदेशातला. ‘जवान सीमेवर बिकट परिस्थितीत देशाची सेवा करतो आणि जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचं सांगत तेज बहादूर यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. तेज बहादूर कोणत्याही सरकारबद्दल बोलत नाहीत. मात्र, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्यांचा राग आहे.

हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यावर माझं काय होईल हे मला माहीत नाही. अधिकाऱ्यांचे हात खूप लांबपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आमचे दुख: कोणी समजू शकत नाही. म्हणून तुम्हीच हा व्हीडिओ जास्तीत जास्त शेअर करा असं अावाहनही तेज बहादूर या व्हीडिओत करताना दिसत आहेत. दरम्यान, आम्ही बीएसएफ जवानाचा व्हीडिओ पाहिला असून, संपूर्ण रिपोर्ट मागवला आहे आणि योग्य कारवाईचे आदेशही दिले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून दिली आहे.

Loading Comments