Advertisement

आशिष शेलार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?

मुंबईत भाजप लोकसभेच्या पाच जागांवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एका जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

आशिष शेलार उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार?
SHARES

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, आतापर्यंत महाराष्ट्रात महायुती किंवा महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र, लोकसभेच्या संभाव्य उमेदवाराबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुंबईत भाजप लोकसभेच्या पाच जागांवर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना एका जागेवर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. याबाबत कुठलाच खुलासा करण्यात आला नाही. 

शिंदे गटाकडून 'यांना' उमेदवारी

महायुतीमधून जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोणाला कोणत्या जागा मिळणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच शिंदे गटाने लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. खसादार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिंदे गटाच्या पहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले आहे. नाशिक मधून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. 

नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आणायचंय, दुस-या कोणाचं नाव नसल्याचं श्रीकांत शिंदेनी म्हंटल आहे. महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार आणायचे आहेत. त्यात गोडसेसुद्धा असतील असं विधान श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. आता भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असेल याकडेच सगळ्यांचं लक्ष लागल आहे. 

आशिष शेलार लोकसभा निवडणूक लढवू शकतात

लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना उमेदवारी देऊ शकतो. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पक्ष आशिष शेलार यांना लोकसभेचे तिकीट देऊ शकतो. सध्या भाजपच्या पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत, मात्र यावेळी पक्ष त्यांचे तिकीट रद्द करू शकतो. 

भाजप नेते सुधीर मुनंगटीवार आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना लोकसभा लढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर, संदीपान भुमरेंना संभाजीनगरमधून लढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  मुनगंटीवार, भुमरे लोकसभा लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सुधीर  मुनगंटीवारांनी मात्र दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे.



हेही वाचा

रेल्वेमंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीबाबत तीन-चार दिवसांत निर्णय घेणार - राज ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा