Advertisement

राम मंदिर वर्गणी: राऊतांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांचं टीकास्त्र

संजय राऊतांच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राम मंदिर वर्गणी: राऊतांच्या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांचं टीकास्त्र
SHARES

अयोध्येतील राममंदिर आणि हिंदुत्वावरुन पुन्हा एकदा भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी रामभक्त आणि सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 'अयोध्येच्या राजासाठी वर्गणी गोळा करायला घरोघरी जाणार हा अयोध्येच्या राजाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे', अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊतांच्या या भूमिकेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करत आहे?, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी  केला आहे. संजय राऊत आणि शिवसेना या दोघांनाही राम मंदिराच्या कामात अडंग आणण्याची भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त कोण करत आहे, पायाभरणी कार्यक्रमही ई पद्धतीनं घेण्याची मागणी होती, आता सामान्य नागरिकांच्या स्वेच्छेनं येणाऱ्या निधीतून राम मंदिराचं काम होत आहे. आधी म्हणायचं पहिले मंदिर फिर सरकार, पण सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडंग आणायचा, या पद्धतीची राम मंदिर विरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असं आमचं मत आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

या आंदोलनात ज्यांची केवळ राजकीय घुसखोरी होती त्यांनाच राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी झाली होती आणि त्यांनाच आता रामवर्गणी डोळ्यात खूपते आहे. मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीनं चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे?, असा टोलाही यावेळी शेलार यांनी लगावला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा