Advertisement

''बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे'' - आशिष शेलार

वरळीतल्या या दुर्घघटनेनंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्या व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली.

''बदनामीपासून तुम्हीच आता वाचायला हवे'' - आशिष शेलार
SHARES

वरळी येथील बीडीडी चाळीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत बालकाच्या व वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईचेही सोमवारी निधन झाले. ही घटना ३० नोव्हेंबरला झाली होती. यानंतर आशिष शेलार यांनी ४ डिसेंबरला पत्रकार परिषद घेत 'सिलिंडर स्फोटात ७२ तासानंतर मुंबईचे महापौर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात' असं वक्तव्य केल्याची मीडियात चर्चा होती. यावर महापौरांनी आक्षेप घेतला आहे.

वरळीतल्या या दुर्घघटनेनंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्या व महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. आशिष शेलार यांच्या टीकेनंतर राजकीय वातावरणात मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याबाबत आशिष शेलार यांनी ''आपण आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौरांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत'', असं म्हटलं आहे.

"मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. ना कोणत्या महिलांबद्दल, ना महापौर महोदयांबद्दल. माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल."

आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना विनंती केली आहे. "माझी मा. महापौरांना विनंती आहे की, मी जे बोललोच नाही, तेच तुमचेच समर्थक सोशल मीडियावर लिहित आहेत, पसरवत आहेत. या बदनामी पासून तुम्हीच आता वाचायला हवे", असं आमदार आशिष शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना म्हटलं.

मुंबईची महापौर ही एक महिला आहे. प्रथम नागरिक असून ते अत्यंत महत्त्वाचे पद आहे. असे असताना माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह आहेत. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्त्याचा मी निषेध व्यक्त करीत असून त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे त्यामुळे माझा व समस्त स्त्री जातीचा अवमान केला आहे. यामुळे शेलारांविरोधात पोलिसांत तक्रार करत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर  यांनी म्हटले आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा