'आरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू'

 Pali Hill
'आरक्षण द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू'

मुंबई - आरक्षण द्या, नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे. मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास विरोध असल्याचं सांगितलं. मात्र, काँग्रेसने धर्माच्या आधारे नाही, तर मागासलेपणाच्या आधारावर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिलं होतं. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या अध्यादेशाकडे भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. नवीन कायदा करू, असे सांगूनही आता दीड वर्ष झाले आहे, यातून हा पक्ष किती खोटारडा आहे हे सिद्ध होते अशी टीका चव्हाण यांनी या वेळी केली.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांना व्होट बँक समजू नका, त्यांना समान वागणूक द्या, असं म्हणतात, मात्र त्याच वेळी राज्यातील भाजप सरकार मुस्लिम समाजाच्या हक्काचे आरक्षण त्यांना देत नाही, यावरून भाजपाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

Loading Comments