निवृत्त बँक कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी

 Santacruz
निवृत्त बँक कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी
निवृत्त बँक कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी
निवृत्त बँक कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी
See all

सांताक्रूझ - 1000-500 रुपयांच्या नोटबंदीचा निर्णय झाला आणि लोकांची बँकांबाहेर एकच गर्दी झाली. यामुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढला. मात्र कर्मचाऱ्यांचा हा ताण कमी व्हावा म्हणून निवृत्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांनी बँकांमध्ये येत काम केलं. सांताक्रुझ पश्चिम परिसरातील पंजाब बँकेतील निवृत्त गिरीजा पाटकर आणि श्याम दुबे यांनी बँकेत येऊन काम केल्याचं पाहायला मिळालं. गिरीजा पाटकर आणि श्याम दुबे हे मागच्या वर्षी सेवेतून निवृत्त झालेत. मात्र कर्मचाऱ्यांची मदत आणि जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं गिरीजा पाटकर आणि श्याम दुबे यांनी बँकेत काम करण्याची परवानगी मॅनेजर ब्रिजेश सिंह यांच्याकडे मागत कामाला सुरूवातही केली.

Loading Comments