Advertisement

'टायटॅनिक कमिंग सून' 'तुंबई'बाबत नितेश राणेंचं ट्वीटास्त्र


'टायटॅनिक कमिंग सून' 'तुंबई'बाबत नितेश राणेंचं ट्वीटास्त्र
SHARES

पावसाळा डोक्यावर असताना मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरू आहे. नालेसफाईची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन महापालिकेने दिलं होतं. मात्र त्याची पूर्ती काही केलेली दिसत नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याने मुंबईची-तुंबई होणार हे निश्चित. आता याकडे पालिकेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी ट्विट करत एक फिल्मी फोटो टाकला आहे. हे ट्विट सध्या चर्चेत आलं आहे.


काय आहे या ट्वीटमध्ये?

नितेश राणे यांनी टायटॅनिक चित्रपटाची थीम वापरत मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचं पाणी तुंबलेलं असेल आणि चित्रपटात दाखवल्याप्रमाणे टायटॅनिक जहाजासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं भाकीत करणारं एक फोटो टाकला आहे. याला 'टायटॅनिक मुंबई व्हर्जन कमिंग सून' अशी टॅगलाईन दिली आहे. यात डायरेक्टर मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता असतील, तर असिस्टंट डायरेक्टर शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर असतील. यात UT कुटुंबाचे म्हणजे ठाकरे यांचे विशेष आभार असं बोलकं आणि मार्मिक ट्वीट त्यांनी केलं आहे. यात टायटानिक चित्रपटाचा फोटो देखील टाकला आहे.

या ट्विटमुळे राजकारण चांगलंच पेटणार असून येत्या काही दिवसात राणे आणि शिवसेना यांच्यात ट्वीटवॉर पाहायला मिळेल ही शक्यता नाकारता येणार नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा