Advertisement

भाजप-मनसे युती होण्याच्या चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी रात्री बैठक झाली.

भाजप-मनसे युती होण्याच्या चर्चांना उधाण
SHARES

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), भाजपा (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाबरोबर राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा चौथा जोडीदार म्हणून या युतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनसेच्या (MNS) प्रमुख नेत्यांनी मंगळवारी (6 फेब्रुवारी रोजी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' बंगल्यावर भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आलंय. मंगळवारी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दक्षिण मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

सध्या मनसे कोणत्या जागांवर कोणते उमेदवार देता येतील याची चाचपणी केली जात आहे. मंगळवारी मनसेच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याबरोबर 'सागर' बंगल्यावर जाऊन चर्चा केल्याच्या वृत्ताला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही दुजोरा दिला आहे. मात्र अधिक तपशील त्यांनी दिला नाही. त्यामुळे या बैठकीबद्दलचं गूढ अधिक वाढलं आहे.

भाजपच्या अनेक नेत्यांनी मागील काही काळापासून दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक विधानं केली आहेत. बऱ्याचदा भाजपाचे दुसऱ्या फळीतील नेतेही राज ठाकरेंना भेटले आहेत. टोलनाक्याचा मुद्दा वगळता दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं नाही. हेही वाचा

राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवारांना धक्का!

सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यावर फोकस करावं - छगन भुजबळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा