Advertisement

शिवसेनेची भूमिका ही आमची नव्हे, नाना पटोले याचं वक्तव्य

हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेत पुन्हा एकदा समोर आले आहेत.

शिवसेनेची भूमिका ही आमची नव्हे, नाना पटोले याचं वक्तव्य
SHARES

हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमधील (congress) मतभेत पुन्हा एकदा समोर आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण करताना वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही?, असा प्रश्न भाजप आणि केंद्र सरकारला विचारला होता, त्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले, भारतरत्न प्रदान करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची नाही. राज्य सरकारकडून केवळ नावाचा प्रस्ताव सादर करण्यात येऊ शकतो. परंतु अंतिम निर्णय हा केंद्र सरकारचाच असतो. त्यामुळे यावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असण्याचं काहीच कारण नाही. 

भारतरत्न कुणाला द्यावा यासंदर्भातील भूमिका शिवसेनेने (shiv sena) मांडली आहे. परंतु शिवसेनेची भूमिका ही वेगळी आणि आमची भूमिका वेगळी आहे. आमच्या मते छत्रपती शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधिमंडळ सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजपच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा खरपूस समाचार घेतला होता.

हेही वाचा- उद्धव ठाकरे विसरलेत ते मुख्यमंत्री आहेत म्हणून, ‘बाबरी’वरून अबू आझमींचा संताप

“बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व शेंडी-जाणव्याचं नव्हतं. बाबरी पाडल्यानंतर येडेगबाळे पळून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. आता विषय असा झालेला आहे, बाबरी कुणी पाडली? आम्हाला माहिती नाही. बाबारी आम्ही पाडलेली नाही. मात्र शिवसेनाप्रमखांनी सांगितलं की, जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे. नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. 

म्हणजे बाबरी पाडली कुणी? आम्ही नाही पाडली. ६ वर्षे केंद्रात सत्ता असताना देखील, राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कुणी दिला, सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले, आमचं नाव आलं पाहिजे. वीर सावरकरांना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविण्यात आलं होतं. भारतरत्न देण्याचा हक्क हा पंतप्रधान आणि समितीचा आहे. तरीही अद्याप सावरकरांना भारतरत्न का देण्यात आला नाही? ” असे प्रश्न विचारत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपला कोंडीत पकडलं.

(bharat ratna should be conferred upon savitribai phule and shahuji maharaj demands nana patole)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा