Advertisement

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने एकत्र येऊन भाजपला एकाकी पाडले. त्यानंतर आता शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भाजपला आणखी एक धक्का
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने एकत्र येऊन भाजपला एकाकी पाडले. त्यानंतर आता शिवसेनेने भाजपला आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांचे स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय सर्व सदस्यांनी बहुमताने घेतला. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे स्थायी समितीमध्ये अडीच तास गोंधळ झाला.

 बुधवारी मुंबई महापालिकेत सहा महिन्यांनी स्थायी समितीची सभा झाली. बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी भाजपचे स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी सदस्यत्वाबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार स्वीकृत नगरसेवकाला स्थायी समितीचे सदस्य होता येणार नाही, असा आक्षेप राऊत यांनी घेतला.

याला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा दिला. नगरसेवक म्हणून निवडून आलेलेच स्थायी समितीचे सदस्य होऊ शकतात असा दावा रवी राजा यांनी केला. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी कायद्यानुसार स्वीकृत सदस्याची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती होऊ शकत नाही असं म्हणत हरकतीच्या मुद्द्याला पाठिंबा दिला.

भाजपची बाजू गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडली. शिंदे यांनी स्थायी समितीत नियुक्त करण्यात आलेले शिवसेना सदस्य के.पी.नाईक यांचं उदाहरण दिलं. के.पी.नाईक हे स्वीकृत नगरसेवक होते. १९९८ ते २००२ मध्ये नाईक हे स्वीकृत सदस्य असताना पाच वर्षे स्थायी समितीचे सदस्य होते.  शिवसेना आता सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.  

त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शिरसाट यांचं सदस्यत्व रद्द करत असल्याचं जाहीर केले. के.पी.नाईक सदस्य असताना कोणी आक्षेप घेतला नसेल. पण आता आक्षेप घेण्यात आला आहे. शिरसाट यांची नियुक्ती चुकीची होती. त्यामुळे ती रद्द करण्यात आली असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हेही वाचा -

सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल: एक ते दोन दिवसांत निर्णय? 

जी उत्तर विभागातील वरळी परिसर रुग्णसंख्येत शेवटच्या क्रमांकावरसंबंधित विषय
Advertisement