Advertisement

अरुण अडसड विधान परिषदेवर बिनविरोध


अरुण अडसड विधान परिषदेवर बिनविरोध
SHARES

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध ठरली आहे. भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. मात्र याची अधिकृत घोषणा येत्या दोन तीन दिवसात होण्याची शक्यता आहे.


३ ऑक्टोबरला पोटनिवडणूक

राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ३ ऑक्टोबरला पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस होता. भाजपचे माजी आमदार अरुण अडसड यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या रिक्त जागेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननीनंतर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होईल.


कोण आहेत अरूण अडसड?

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यासह इतर भाजपचे नेते उपस्थित होते. अरूण अडसड हे दोन वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. याचसोबत त्यांनी केंद्रीय कृषी आयोगाचे अध्यक्षपद देखील भूषवलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा