मुंबई - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पर्यावरण आणि समुद्र किनारच्या खारफुटीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. वांद्रे, खार सांताक्रूझ समुद्र किनारची खारफुटी वाचवण्यासाठी त्यांनी बॉलिवूड सुपरस्टार अामीर खानची भेट घेतलीये. पर्यावरण आणि खारफुटीचं महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी अामीरची मदत घेतली जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी अामिरच्या वक्तव्यामुळे त्याचा अतुल्य भारत अभियानात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता खारफुटी वाचवण्यासाठी त्याची मदत घेतली जाणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं.