• राम मंदिर स्थानकाच्या श्रेयासाठी भाजपा सरसावले
SHARE

मुंबई - नुकतेच नामकरण केलेल्या राममंदीर या स्थानकाच्या नावावरून श्रेयवादाला सुरूवात झालीय. शनिवारी भाजपाच्या आमदार आणि राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी नागरिकांसोबत स्टेशनवर ढोल-ताशा,पथक आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. या नवीन बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचं नाव देण्याअगोदरच उद्घाटनाचा कार्यक्रम रविवारी 27 नोव्हेंबरला ठेवण्यात आला होता. मात्र या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी राज्य सरकारनं राम मंदिर हे नाव जाहीर केल्यामुळे उद्घाटनाची तारीख पुढे ढकलली. मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राम मंदिर स्थानकाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या