Advertisement

'तो' अहवाल फुसकी लवंगी की अॅटोम बॉम्ब लवकरच कळेल – फडणवीस


'तो' अहवाल फुसकी लवंगी की अॅटोम बॉम्ब लवकरच कळेल – फडणवीस
SHARES

ज्या प्रकारच्या घटना महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बाहेर येतात त्या राज्यासाठी चिंताजनक आहेत. त्यामध्ये हप्तावसुली, ट्रान्सफर रॅकेट सारखे प्रकरण, कोरोना प्रकरण हाताळण्यात आलेले अपयश आणि बिघडलेली कायदा सुव्यवस्था पाहता त्यावर मुख्यमंत्र्यांचे मौन एक शब्द मुख्यमंत्री (uddhav thackeray) बोलत नाहीत. म्हणूनच राज्यपालांना भेटून राज्यात घडलेल्या १०० घटनांची माहिती आम्ही राज्यपालांना दिली असल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिली आहे.

मुख्यमंत्री सगळ्या प्रकरणावर काहीच बोलत नाहीत. म्हणूनच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना अहवालाच्या माध्यमातून बोलत करून घ्यावे अशी मागणी आम्ही राज्यपालांना केली आहे असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संविधानिक प्रमुख म्हणून राज्यपालांनी बोलावे अशी मागणी भाजपकडून राज्यपालांना करण्यात आली. हप्ता वसुली, ट्रान्सफर रॅकेट आणि कोरोना रोखण्यात असलेले अपयश आले याचा अहवाला राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशी मागणी भाजपने केली. राज्यपालांना हा अधिकार असल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय गृहसचिवांना दिलेला महाराष्ट्रातील पोलिस अधिकाऱ्यांच्या रॅकेटबद्दलचा अहवाल हा फुसकी लवंगी होती की अॅटम बॉम्ह होता हे लवकरच कळेल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. जर फुसकी लवंगी असेल तर हा अहवाल २५ ऑगस्टपासून हा अहवाल का दाबून ठेवला आहे ? यामधून कोणाचे चेहरे समोर येणार होते ? अहवाल बाहेर आल्यावर कोणाला वाचवण्यासाठी तुम्ही हा अहवाल दाबून ठेवला असाही सवाल फडणवीस यांनी केला. राज्यपालांच्या भेटीत आम्ही राज्यपालांना सांगितले की महावसुली सरकार असून या सरकाने नैतिकता आणि लोकशाही सोडली आहे. हे सरकार मनमानी कारभार करत केवळ हप्ता वसुली आणि ट्रान्सफर रॅकेट चालवत असल्याचेही आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणले आहे.

या हप्तावसुली आणि ट्रान्सफर रॅकेटच्या प्रकरणात पवारांनी दोन प्रेस घेतल्या. त्याध्येही पवारांनी दोषींना पाठीमागे घेण्याची मागणी केली. हा संपुर्ण झालेला प्रकार पवारांनी पाठिमागे घातला आहे. तर या संपुर्ण प्रकरणात कॉंग्रेस पक्ष म्हणून भूमिकाहीन असल्याचे फडणवीस म्हणाले. कॉंग्रेसचे नेते दिल्लीत आणि महाराष्ट्रात वेगवेगळ बोलतात. पण या संपुर्ण प्रकरणात कॉंग्रेसला किती हिस्सा मिळतो असाही सवाल त्यांनी केला. तिन्ही पक्षाला माहित होते की यामधून तिन्ही पक्षाचा चेहरा उघड होईल.



हेही वाचा -

महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचं वसुलीचं टार्गेट १०० कोटी असेल तर, इतरांचं..?

“मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा