Advertisement

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद

सरकारी अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्यानं खळबळ उडाली असून फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासल्याने वाद
SHARES

भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. किरीट सोमय्या काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईली तपासत होते. यावेळी काढलेला किरीट सोमय्या यांचा हा फोटो वादाच कारण ठरत आहे.

सरकारी अधिकाऱ्यांनी किरीट सोमय्यांना थेट मंत्रालयात प्रवेश दिल्यानं खळबळ उडाली असून फोटोमध्ये नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचं दिसत आहे.

या प्रकरणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. 'भाजपा नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन अत्यंत बेफाम झालं आहे. महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे. 

किरीट सोमय्या ज्या पद्धतीने नगरविकास खात्याच्या मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे. जर त्यांनी आरटीआय अंतर्गत परवानगी घेतली नसेल तर हा गुन्हा आहे, म्हणूनच चौकशी व्हावी. जर गुन्हा घडल्याचं सिद्ध झाला तर गुन्हा दाखल झाला पाहिजे', असं सचिन सावंत यांनी म्हटलं.

'नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही', असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा