Advertisement

“अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची घोषणा केली नसल्याने भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

“अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट”
SHARES

परतीच्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला मागील दोन ते तीन दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. शेतकऱ्यांची हाताला आलेली पिकं पावसाने आडवी झाल्याने त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. अशा वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप शेतकऱ्यांसाठी तातडीने मदतीची घोषणा केली नसल्याने भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. (bjp leader ashish shelar criticised uddhav thackeray over farmers aid)

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केवळ बाॅलिवूड वाचवण्याचीच चिंता पडली असून शेतकऱ्यांच्या हालापेष्टा त्यांना दिसत नाही. शिवाय एकिकडे पब आणि बार यांना रात्री उशीरापर्यंत परवानगी आणि मंदिरं उघडण्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा - बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट.. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले… शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त.. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर.. तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यात चिंतातूर झालेले! मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय.. त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना.. पब, बार, रेस्टॉरंट रात्री ११.३० वाजेपर्यंत खुले ठेवून "नाईटलाईफची" काळजी "राजपूत्र" करीत आहेत. दुर्दैवी चित्र.. "महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा!

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिल्म वितरकांशी झालेल्या चर्चेवेळी विरोधकांना इशारा दिला होता. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही, तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलीवूड सिनेमांना तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहेत. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठं मनोरंजन उद्योग क्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते, तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

त्यावरच आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा - “अन्यथा, लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”

संबंधित विषय
POLL

आजच्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स किती धावांचा डोंगर रचेल, असे वाटते ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा