Advertisement

“अन्यथा, लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत घराबाहेर पडून शेतकऱ्यांचं सांत्वन करावं, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

“अन्यथा, लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल”
SHARES

परतीच्या पावसाने अवघ्या महाराष्ट्राला मागील दोन ते तीन दिवसांपासून अक्षरश: झोडपून काढलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं पावसाने आडवी झाल्याने त्यांच्यावर मोठं संकट कोसळलं आहे. अशा वेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरीत घराबाहेर पडून शेतकऱ्यांचं सांत्वन करावं, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. (mns leader bala nandgaonkar urges cm uddhav thackeray to meet heavy rain affected farmers in maharashtra)

कोरोनाच्या संकटकाळात मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडून महाराष्ट्र दौरा करून सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. त्यानंतर आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतरही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री न गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी टीका करण्यात आली. त्यातच आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना झोडपून काढल्याने मुख्यमंत्र्यांनी बाहेर जाऊन शेतकऱ्यांचं सांत्वन करावं आणि त्यांना आर्थिक दिलासा दिलासा द्यावा, अशी अपेक्षा केली जात आहे.

हेही वाचा- बाॅलिवूडला संपवण्याचे प्रकार सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

यासंदर्भात भाष्य करताना मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचं टाळत आलो, पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल, असं म्हणत नांदगावकर यांनी ठाकरे नावाला साजेसं वर्तन करण्याविषयी सुचवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय घेत असल्याचं सांगितलं होतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा