Advertisement

‘तो’ फोटाे ट्विट करून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवण केलं. या दोघांचे जेवणाचे फोटो ट्विट करून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘तो’ फोटाे ट्विट करून चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी पाटण तालुक्यातील आंबेघरमधील विस्थापित गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी फडणवीस आणि दरेकरांनी गावकऱ्यांसोबत जेवणही केलं. या दोघांचे जेवणाचे फोटो ट्विट करून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पूरग्रस्त आंबेघरमधील गावकऱ्यांचं मोरगिरीतील मोरणा विद्यालय आणि धावडे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्यात आलं आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि प्रविण दरेकर यांनी बुधवारी या विस्थापित गावकऱ्यांची भेट घेतली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्यापुढील अडचणी आणि सरकारकडून होत असलेली मदत यांची माहिती त्यांना दिली.

हेही वाचा- मुख्यमंत्री Work From Home करू शकतात, पण मुंबईकरांना ऑफिसला जावं लागतं - केशव उपाध्ये

विरोधी पक्षनेते भेटीला येणार असल्याने सकाळपासून छावणीतील गावकरी त्यांची उपाशीपोटी वाट बघत होते. हे कळताच फडणवीस आणि दरेकर यांनी गावकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत जेवण केलं. हा फोटो ट्विट करून चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपाणाचं कौतुक केलं. तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारवर निशाणा देखील साधला.

एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची जाहीर मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास… खरच चित्रं खूप बोलकी असतात..!!! असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी नुकताच चिपळूण इथं पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांच्यासोबत असलेले आमदार भास्कर जाधव यांनी उद्विग्न झालेल्या एका महिलेसोबत वाद घातल्याचं म्हणण्यात येत होतं. परंतु संबंधित महिला आणि जाधव दोघांकडूनही याबाबत खुलासा करण्यात आल्यानंतर यावर पडदा पडला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा