Advertisement

“मोदींचं नाव स्टेडियमला देऊ, नाहीतर घराला, तुमच्या पोटात का दुखतं?”

“आम्ही मोदींचं नाव स्टेडियमला देऊ नाहीतर घराला, तुमच्या पोटात का दुखतं?” असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

“मोदींचं नाव स्टेडियमला देऊ, नाहीतर घराला, तुमच्या पोटात का दुखतं?”
SHARES

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. या नामकरणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून मोदी सरकारला घेरलं जात असताना “मोदी हे इतके मोठे नेते झाले आहेत की आता तर ते मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागले आहेत”, अशा खोचक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर “आम्ही मोदींचं नाव स्टेडियमला देऊ नाहीतर घराला, तुमच्या पोटात का दुखतं?” असा सवाल भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना स्टेडियमच्या नामकरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरदार वल्लभभाई पटेल हे त्यांचे आदर्श आहेत तसे आमचेही आहेत. पण मोटेरा स्टेडियमचा निर्णय हा त्यांच्या राज्य सरकारचा निर्णय असेल किंवा क्रिकेट बोर्डाचा असेल. त्याच्यामध्ये आम्ही काय भूमिका घेऊ शकतो. यापूर्वीही आपापल्या राज्यात अनेकांनी अशी नावं दिली असतील. त्यांना ते योग्य वाटलं असेल. पण मोदी हे इतके मोठे नेते आहेत. आता तर ते मला सरदार पटेलांपेक्षाही मोठे वाटायला लागले आहेत, अशा रितीने खोचक टीका केली.

हेही वाचा- “परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’”

त्याला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते आहेतच, ते देशातील पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत. पण संजय राऊत कुठल्या खालच्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला ठाऊक नाहीत. स्टेडियमला मोदींचं नाव देण्यावर कुणाचा आक्षेप आहे का? पुण्यातील सुब्रतो राय यांनी बांधलेल्या स्टेडियमचं उद्घाटन करायला शरद पवार जातात, तेव्हा सुब्रतो राय त्यांच्यापेक्षा मोठे ठरतात का? तसं नसेल, तर संजय राऊत यांनी आता असे पांचट विषय काढून बोलणं बंद करावं. 

आम्ही मोंदीचं नाव स्टेडियमला देऊ नाहीतर घराला देऊ, तुमची हरकत असेल तर कोर्टात जा, हरकत नसेल, तर तुमच्या पोटात का दुखत? नेहमीप्रमाणे ही संजय राऊतांची कुरकुर आहे. संजय राठोडांचा विषय शिवसेनेसाठी अडचणी झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नवा विषय काढून जुना विषय दुसरीकडे वळावायचा हे संजय राऊत यांचे जुने फाॅर्म्युले आहेत, असं निलेश राणे म्हणाले. 

(bjp leader nilesh rane slams sanjay raut on name change of pm modi stadium)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा