Advertisement

म्हणे, सध्या महाराष्ट्राला फडणवीसांची गरज, डावखरेंच्या ट्विटवर नेटिझन्स भडकले

भाजप नेते निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका केली आहे. त्यावर नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत.

म्हणे, सध्या महाराष्ट्राला फडणवीसांची गरज, डावखरेंच्या ट्विटवर नेटिझन्स भडकले
SHARES

कोरोनाच्या (Coronavirus) संकटाने देशभर थैमान घातलं आहे, अशा स्थितीत सगळे हेवेदावे विसरून एकजुटीने या संकटाचा मुकाबला करण्याची गरज असताना, भाजपच्या एका नेत्याला मात्र याचं भान राहिलेलं दिसत नाही. त्यातूनच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका केली आहे. त्यावर नेटकरी मात्र चांगलेच भडकले आहेत. 

हेही वाचा- Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात कोरोनाचे (COVID-19) सगळ्यात जास्त रुग्ण आढळून आल्याने सरकारी यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. असं असूनही कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी पातळीवर शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) परिस्थितीतवर नजर ठेवतानाच आरोग्य अधिकारी, प्रशासकीय यंत्रणेसोबत सातत्याने बैठका घेऊन त्यांना निर्देश देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (state health minister rajesh tope) देखील कोरोनाग्रस्तांना योग्य उपचार मिळण्यासोबतच हा व्हायरस पसरू नये, यासाठी प्रशासनाला सूचना करत आहेत. 

अशा आपत्कालीन परिस्थितीत राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडूनही सहकार्याची अपेक्षा असताना, भाजपचे नेते निरंजन डावखरे (bjp leader niranjan davkhare) यांनी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरून निशाणा साधला आहे. ही आपत्कालीन परिस्थितीत हाताळण्यासाठी ठाकरे असमर्थ असून त्यांच्या जागी आता देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) असायला पाहिजे होते, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.

सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे, असं ट्विट डावखरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून केलं आहे. या ट्विटवर नेटिझन्स चांगलेच भडकले असून ही राजकारण करण्याची वेळ नाही, असं म्हणत डावखरेंना टोलवत आहेत.

हेही वाचा- Coronavirus Update: आपण फेज २ मध्ये, पुढचे १० दिवस खूप महत्त्वाचे - आरोग्यमंत्री राजेश टोपे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा