Advertisement

पंकजा मुंडेंनी मुंबईत बोलावली नाराज समर्थकांची बैठक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

पंकजा मुंडेंनी मुंबईत बोलावली नाराज समर्थकांची बैठक
SHARES

भाजप (bjp) नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात राजीनामा दिलेलं पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याचं समजत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचा समज असल्याने एकापाठोपाठ एक करून ते राजीनामा देत आहेत. आतापर्यंत मुंडे समर्थक बीडमधील ७७, अहमदनगर २५-३० भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीडमधील तर सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करूया असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

हेही वाचा- सहकार हा राज्याच्या अखत्यारीतला विषय- नवाब मलिक

नाराज समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे (pankaja mumde) यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती, असंही त्या म्हणाल्या होत्या.

मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळे मुंडे समर्थक नाराज आहेत, असं म्हटलं जातं. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यात मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. यासाठीच कराड यांना जाणीवपूर्वक मंत्रिपद देण्यात आलं आहे. कराड हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या जवळचे मानले जातात.

या बैठकीत आता पंकजा मुंडे आपल्या समर्थकांना कशा रितीने समजावणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. याआधी देखील पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याच्या चर्चा येत होत्या. त्यावेळी देखील मुंडे यांना खुलासा करावा लागला होता.

(bjp leader pankaja munde called a meeting of supporters in mumbai)

हेही वाचा- तर निवडणुकीत सत्ताधारी पक्षांवर बहिष्कार टाकू; राज्यातले व्यापारी संतापले

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा