Advertisement

मुंबईत भाजप-मनसे युतीची चर्चा?

राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती होऊ शकते, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

मुंबईत भाजप-मनसे युतीची चर्चा?
SHARES

ग्रामपंचायत निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजप युती करणार का? अशा चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी भेट घेतली. या भेटीनंतर लाड यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे (bjp-mns) युती होऊ शकते, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवारी दादर, शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे अर्ध्या तासांहून अधिक वेळ बातचीत झाली. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. 

हेही वाचा- कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याचं लोकार्पण

यावेळी त्यांना ही भेट युती संदर्भातील चर्चेसाठी होती का? असा प्रश्न विचारला असता, प्रसाद लाड म्हणाले, राज ठाकरे (raj thackeray) यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळेच त्यांची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली. आजची भेट ही केवळ वैयक्तिक आणि मैत्रीची भेट होती. 

मुंबई महापालिका (bmc) निवडणुकीत भाजप एकटा लढणार की मित्रपक्षांना सोबत घेणार या प्रश्नावर बोलताना, आमच्यासोबत जे लोकं येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. मात्र भाजप-मनसे युतीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. काहीही असलं, तरी भाजप मुंबई महानगरपालिका निवडणूक ताकदीनं लढणार आणि भाजपचा झेंडा महनगरपालिकेवर फडकणार हे निश्चित आहे. शिवसेनेची परंपरागत असलेली सत्ता आम्ही काढून घेणार आहोत. योग्य वेळी योग्य ते उत्तर दिलं जाईल. मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

(bjp leader prasad meets mns chief raj thackeray)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा