Advertisement

कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याचं लोकार्पण

मुंबईच्या कुलाबा परिसरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं.

कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पुतळ्याचं लोकार्पण
SHARES

मुंबईच्या कुलाबा परिसरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार २३ जानेवारी २०२१ रोजी लोकार्पण करण्यात आलं. बाळासाहेबांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. 

या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 

यावेळी, आजचा दिवस हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे. हा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. काही काही क्षण असे असतात की ज्यावेळी आपण फार बोलू शकत नाही. बाळासाहेब हे देशातील मोठे मार्गदर्शक होते. त्यांचं मार्गदर्शन कायम फायदेशीर ठरणारं आहे. बाळासाहेबांचे अनेक नेत्यांशी ऋणाणुबंध होते. आज या सोहळ्याला सर्व पक्षांचे नेते पक्षीय मतभेद विसरून उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो, अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिवादन

शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा घडवला आहे. या पुतळ्याची उंची ९ फूट असून १२०० किलो ब्राँझ धातूपासून हा पुतळा साकारण्यात आला आहे. दोन फूट उंच हिरवळीसह सुमारे १४ फूट उंचीच्या चौथऱ्यावर बाळासाहेबांचा पुतळा दोन्ही हात वर करून जनतेला अभिवादन करताना दिसत आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या माध्यमातून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. 

सोबतच या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, छनग भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल आणि महाविकास आघाडीतील मंत्री उपस्थित होते.

(maharashtra cm uddhav thackeray unveils shiv sena chief late bal thackeray statue at colaba)

हेही वाचा- कुलाब्यात बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा