Advertisement

कुलाब्यात बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची २३ जानेवारीला जयंती आहे.

कुलाब्यात बाळासाहेबांच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्तानं मुंबईच्या (Mumbai) कुलाबा (Kulaba) परिसरातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फूट उंच असा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. सध्या काही काम बाकी असल्यानं पुतळा झाकून ठेवण्यात आला आहे. पण या ठिकाणी पुतळा उभारण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.

व्हाईस अडमिरल (निवृत्त) आणि आपली मुंबई या संस्थेचे अध्यक्ष आय. सी. राव म्हणाले की, “२०१९ मध्येच रहिवाशांनी विरोध केला आहे. २०१३ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सार्वजनिक रहदारीच्या मार्गावर पुतळे उभारू नयेत. याशिवाय उद्धाटनाच्या दिवशी रस्ता बंद करावा लागेल. यामुळे ट्राफिकची समस्या निर्माण होईल. आमचा विरोध राजकीय नाही. तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आहे. एकदा पुतळा उभारला की अनेक जण तिकडे सेल्फी काढणार.”

शिवसेना नगरसेवक यशवंत जाधव, “बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसाठी मोठा त्याग दिला आहे. आधी निवडण्यात आलेल्या ठिकाणी जागेची समस्या होती. पण सध्याची जागा बरीच मोठी आहे. त्यामुळे लोक तिथं उभी राहू शकतात. पुतळ्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. मुंबईकरांचा पुतळ्याला विरोध नाही. जे विरोध करत आहेत ते राजकिय हेतून सर्व करत आहेत.”

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पुरातन वास्तू संवर्धन समितीकडून आणि इतर प्रशासकिय परवानगी घेण्यात आली आहे. त्यामुळे २३ जानेवारीला पुतळ्याचं उद्घाटन होईल.

प्रसिद्ध शिल्पकार शशिकांत फडके यांनी हा पुतळा तयार केला आहे. सध्या हा पुतळा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात चौथऱ्यावर उभा करण्यात आला आहे. 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' असे हे पुतळ्याच्या खाली कोरण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या शब्दांनी यांचे भाषण संपवायचे ते शब्द म्हणजे 'जय हिंद जय महाराष्ट्र' हे सुद्धा या पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्यावर करण्यात आलेले आहे.

२३ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. हे निमंत्रण विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही देण्यात आलेले आहे. राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या स्वतः कृष्णकुंजवर गेल्या होत्या.



हेही वाचा

लाॅकडाऊनच्या काळात दीड लाखांहून अधिक बेरोजगारांना रोजगार

भाजप आमदार राम कदमांचं ‘तांडव’, पोलिसांनी घेतलंं ताब्यात

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा