Advertisement

भाजप आमदार राम कदमांचं ‘तांडव’, पोलिसांनी घेतलंं ताब्यात

‘तांडव’ नावाच्या वेबसीरिज विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणारे भाजपचे आमदार राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाजप आमदार राम कदमांचं ‘तांडव’, पोलिसांनी घेतलंं ताब्यात
SHARES

‘तांडव’ नावाच्या वेबसीरिज विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणारे भाजपचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या वेबसीरिजचे निर्माते जोपर्यंत माफिनामा सादर करणार नाहीत, तसंच जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा राम कदम यांनी घेतला आहे.

‘तांडव’ वेबसीरिजमध्ये अभिनेता झिशान आयुब याच्यावर चित्रीत एका दृश्यामुळं हिंदू देवी-देवतांचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसंच, याबद्दल या वेबसीरिजच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणीही जोर धरु लागली आहे. 

त्यातच आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलीस (mumbai police) ठाण्यात ‘तांडव’ वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात तक्रार केली आहे. यामध्ये हिंदू देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करत वेबसीरिजचा निर्माता, दिग्दर्शक आणि यात काम करणाऱ्या कलाकारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राम कदम यांनी केली आहे.

हेही वाचा- नाहीतर जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, शिवसेनेचा इशारा

“चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का केला जातो. अलिकडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर नवीन वेब सीरिज तांडव. सैफ अली खान पुन्हा एकदा अशाच चित्रपट, सीरिजचा भाग झाला आहे, ज्यातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सीरिजमधून ते दृश्य हटवले पाहिजेत”, असं राम कदम यांनी म्हटलं.

शिवाय घाटकोपर पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्याचा आरोप करत, मंगळवार सकाळी ११ वाजता घाटकोपर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन #tandavwebseries बाबत अजून पर्यंत FIR का घेतला नाही याचा जाब विचारणार.  महाराष्ट्र सरकार पोलिसांना FIR घेण्यापासून रोखते आहे. जर आज FIR घेतला नाही तर पोलिस स्टेशनच्या बाहेर सरकार विरोधात लाक्षणिक उपोषण करणार, असा इशारा राम कदम यांनी दिला होता.

त्यानंतर ठिय्या आंदोलन करतानाच सरकारविरोधात घोषणाबाजी केल्यानंतर अखेर घाटकोपर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे.

(bjp mla ram kadam detained by ghatkopar police for protesting against tandav web series)Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा